• Advertisement
 • Contact
More

  दुसऱ्यांदाही मुलीला जन्म दिल्याचा राग मनात ठेवून पत्नीला पोस्टाने पाठविला तलाक – पीडित महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

  समाजसुधारनेसाठी अनेक कायदे निर्माण झाले असले तरी अजूनही ह्या अनिष्ट चालीरीती सुरूच आहेत. फक्त त्याची वाच्यता जाहीररीतीने केली जात नाही त्यामुळे अशा घटना समोर येत नाहीत. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. ‘तीन तलाख’वर कायदा आणून सरकारने या प्रथेवर बंदी आणली आहे. तरी देखील पत्नीने दुसऱ्यांदाही मुलीला जन्म दिला याचा राग ठेवत पत्नीला तलाख देण्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशाप्रकारची समोर येणारी ही पहिलीच घटना आहे. मुस्लिम समाजातील पिडीत महिलेचा विवाह जामीन अली या व्यक्ती सोबत 12 फेब्रुवारी 2015 ला मुस्लीम रीतीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर पिडीताला जामीन अलीपासुन दोन मुली झाल्या.  त्यात मोठी मुलगी मरियम तीन वर्षांची तर लहान मुलगी रुबी एक वर्षाची आहे. यापूर्वी देखील माहेरून पैसे आणण्यासाठी सासरचे लोक तगादा लावत होते. मात्र, दुसरीही मुलगी झाल्याने या महिलेचा छळ सुरू झाला. माहेरून तीन तोळे सोने माहेरुन आणावे म्हणुन तिचेवर दबाव टाकुण तिला मारझोड केली जाऊ लागली. पिडीतेचा दीर शाहबाज अली तिच्यावर वाईट नजर टाकत होता. त्याबद्दल तिने पतीला बोलली, मात्र उलट तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिलाच मारझोड करण्यात आली. जानेवारी 2020 ला तब्येत खराब झाल्याने पीडिता माहेरी आली. त्यानंतर मार्चला ती परत गेली असता तिला घरी घेण्यास सासरच्यांनी नकार दिला. पतीने तिला मारझोड करून हाकलून लावले. यानंतर ती लग्नात मध्यस्थी करणारे ताहीर अली यांच्या घरी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे गेली. यादरम्यान देखील तिने सासरच्या लोकांना घरी येण्याची विनंती केली. मात्र ती त्यांनी धुडकावून लावली. ती सासरी आली असता तिची तीन वर्षीय मुलगी मारियम हिला हिसकावन्यात आले. जोवर तलाख देत नाही तोवर मुलीला परत देणार नाही अशी धमकी तिला देण्यात आली. मात्र, दोन मुलींचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न तिच्यासमोर होता. याच दरम्यान पतीने 100 रु च्या स्टॅम पेपरवर पोस्टाने तलाख पाठविले. त्यात तीन साक्षीदारांच्या सह्या ही आहेत. विशेष म्हणजे जेव्हा की असे करणे कायद्याने गुन्हा असला तरी असे करण्यात आले. या प्रकरणात पीडित महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि म्हणून प्रकरण समोर आले.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here