• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ फेसबुक पेजविरुद्ध कांग्रेसच्या वरोरा शहरअध्यक्षांची अप्पर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

    राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत १२७व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चेत काँग्रेस पक्षातर्फे सहभाग घेतला होता. या घटनादुरुस्तीला समर्थन दिले. परंतु तो व्हिडीओ अर्धवट ‘देवेंद्र फडणवीस
    फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवरून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका काँग्रेसची संसदेत मागणी या ठळक मथळ्याखाली पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. त्या विरोधात बुधवारी वरोरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष विलास टिपले यांनी अप्पर पोलिस अधिक्षकांकडे या पेजविरोधात तक्रार दाखल केली