• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    देशातील इंधन व जिवनावक्षक वस्तुंचा दरवाढी विरोधात चंद्रपूर विधानसभा युवक कांग्रेचा वतीने सायकल यात्रा जनआंदोलन

    केंद्रातील  मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, केंद्र सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मोदी सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप चंद्रपूर विधासभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष राजेश अडुर यांनी केला आहे. आज शहरातील मुख्य मार्गाने युवक कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकरत्यांनी सायकल यात्रा काढली व पेट्रोल पंपावर लाँसीपाँप वाटत वाढती महागाई व केंद्रातील मोदी सरकार निषेध केला
    यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी युवक कांग्रेसचे विधानसभा अधिक्ष राजेश अडुर पप्पु सिद्धिकी यांचासह युवक कांग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्तीत होते