• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    देशी बनावटीचे पिस्तुल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    चंद्रपूर शहरालगतच्या लखमापूर छत्तीसगढी मोहल्ला येथील रुकधन किराणा दुकानाचे मालक रुकधन परासराम साहू यांच्या घरी देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यामुळे पथकान छापा टाकून पिस्तुल जप्त केले. त्यांचे अंदाजित मूल्य दहा हजार रुपये आहे. देशी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करून आरोपीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केले.