• Advertisement
  • Contact
More

    धक्कादायक : पोलिस अधिकाऱ्यांच्याच बदलीची बनावट यादी व्हायरल 

    महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांची बनावट बदली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे यांनीच या बनावट यादीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिस उपायुक्त दर्जाचे आणि त्याहून वरिष्ठ अधिकार्याची बनावट यादी सोशल मिडियावर वायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मिडियावर बदल्यांबाबत फिरत असलेली अधिकाऱ्यांच्या यादीबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी आहे, असे पांडे यांनी सांगतिले. तसेच या बनावट यादीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस दलातील फक्त पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बदली करण्यात आलेल्या अधिकार्यांच्या यादीत फक्त मुंबई पोलिस दलातील अधिकार्यांचा सहभाग नाही. त्यांच्या बदल्या लवकरच होतील, असेही पांडे यांनी सांगितले.