• Advertisement
 • Contact
More

  परवानगी न घेता बेंबाळ येथे बँड बाजासह विजयी मिरवणूक?

  मारहाणही केल्याचा विरोधी पक्षाचा आरोप.

  कोरोना प्रतिबंध नियमांची पायमल्ली.

  बेंबाळ ग्राम पंचायत मध्ये विशेष सभेत मांडलेल्या सरपंच विरोधातील अविश्वास ठरावाचा निकाल सरपंच कु. करुणाताई जर्मन उराडे यांच्या बाजूने लागल्यानंतर दुसरे दिवशी कुठलीही परवानगी न घेता बेंबाळ येथे बँड पथक व फटाक्याच्या आतषबाजीत विजयी रॅली काढली. दरम्यान रॅली बघणाऱ्या एका विरोधी गटाच्या कार्यकर्त्याला रॅली समर्थकांनी मारझोड केली असून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
  यात कोरोना प्रतिबंध नियमांची पायमल्ली करत अनेक पुरुष व महिला उपस्थित होत्या व सरपंच यांचे नातेवाईक व इतर काही कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होते. विजयाच्या उन्मादात रॅली बघणाऱ्या गावातील विरोधी गटाच्या युवकाला शिक्षक व कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. परवानगी नसताना सुद्धा रॅली काढली व तिथे मारझोड झाली. यामुळे बेंबाळ येथे भविष्यात गुंडेशाही प्रवृत्तीचे उगम होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा नागरिकांचा सूर निघत आहे व गावातील प्रथम नागरिक जर कोरोनाच्या काळात कुठलीही परवानगी नसताना मिरवणूक काढून आनंदाचा जल्लोष साजरा करत असतील तर सामान्य जनतेने काय करायचं असा प्रश्न बेंबाळ येथील जनते समोर निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून बेंबाळ पोलीस चौकी अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.