• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    पुलावरून पाणी वाहत असल्याने धानोरा-गडचांदूर मार्ग दुसऱ्यांदा बंद,पुलाची उंची वाढविण्याची मागणी

    पुलावरून पाणी वाहत असल्याने घुग्गुस जवळील धानोरा-गडचांदूर मार्ग दुसऱ्यांदा रहदारी साठी बंद करण्यात आला असून या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी केली आहे.

    धानोरा-गडचांदूर मार्गावर अनेक कंपन्या असून 24 तास जड वाहनांची वाहतूक सुरू असते, तसेच या मार्गावर अनेक गावं असून नागरिकांची रहदारी सुद्धा सुरू असते. अशातच मागील 5 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा- गडचांदूर मार्ग दुसऱ्यांदा राहदरीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

    या आधी सुद्धा 22 जुलै ला घुग्गुस पोलिसांनी धानोरा फाट्यावर बॅरिकेट्स लावून हा मार्ग बंद केला होता.त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी केली आहे.