• Advertisement
  • Contact
More

    बल्लारपूर शहरालगत कळमना येथे लागलेल्या आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप विळख्यात, लाखो टन सुबाभूळ- बांबू- निलगिरी चा लाकुड खाक

    बल्लारपूर शहरालगत कळमना येथे लागलेल्या भीषण आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप विळख्यात सापडला आहे. 20 एकरावर पसरलेल्या या या डेपोत लाखो टन सुबाभूळ- बांबू- निलगिरी चा साठा होता. हा साठवण डेपो बल्लारपूर पेपर मिल च्या मालकीचा आहे. सुमारे 20 किमी दुर चंद्रपूर शहरातून  आगीचे लोळ दिसत आहे. अग्निशमन बंबांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील आग पेट्रोल पंपापर्यंत पोचली पंप 3 दिवसापासून बंद होता. मात्र स्थानिकांनी स्फोटाचे आवाज ऐकले आहेत.  पेपर मिल- चंद्रपूर मनपा- बल्लारपूर न.प., भद्रावती न.प. – चंद्रपूर वीज केंद्र- घुग्गुस, नागभीड, चिमूर येथून अग्निशमन बंब घटनास्थळी  प्रयत्नांची शर्थ करत होते