• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  बाबुपेठ उड्डाणपूल सहा महिन्यात पूर्ण होण्यासाठी प्रयत्न
  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली कामाची पाहणी

  चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. रेल्वे विभागाकडून १६ कोटीच्या निधीतून करण्यात येणारे काम निधीअभावी रखडले आहे. त्यामुळे लवकरच संबंधित विभागांशी संयुक्त बैठक घेऊन ६ महिन्यात काम पूर्ण व्हावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
  बाबुपेठ उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. यावेळी ते बोलत होते. बाबुपेठ उड्डाणपूल व्हावा यासाठी मागील २५ वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला यश आले. उड्डाणपुलाला मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली. मात्र, निधीअभावी कामाचा वेग मंदावला आहे.
  रेल्वे विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामाचा वेग बघितल्यास पुन्हा वर्ष जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेल्वे विभाग, वीज वितरण यांच्याशी बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले