• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    बिबट्याचा अपघाती मृत्यू
    चंद्रपूर-नागपूर महामार्गावर

    चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती ते वरोरा दरम्यान टाकळी फाट्याजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच भद्रावती वनरिक्षेत्राधिकारी शेंडे व वरोरा वनपरिक्षेत्राधिकारी राठोड यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाच
    पंचनामा केला. पुढील तपास वनविभागा करीत आहेत. या मार्गावर दिवस-रात्र भरधाव व मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. या मार्गापासून काही अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सीमा आहे. या भागात नेहमी वन्यजीवांचा संचार सुरु असतो. आज एक बिबट हा मार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो जागीच ठार झाला.