• Advertisement
  • Contact
More

    ब्रम्हपुरी पोलीसांच्या विशेष पथकाने अवैध देशी दारुचा साठा केला जप्त

    ब्रम्हपुरी पोलीसांचे विशेष पथक हे गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड मक्ता येथील तलावाच्या बाजुला अवैद्यपणे दारु विक्री करण्यासाठी दारुसाठा लपवून ठेवलेला आहे सदर दारुसाठा विक्रीसाठी इतरत्र पाठविण्यात येणार आहे.
    मिळालेल्या माहीतीवरुन विशेष पथकाने सापळा रचत खेडमक्ता येथील तलावाजवळ धाड टाकली असता 36 हजार रुपयांचा अवैद्य दारुसाठा सापडुन आला.
    यातील आरोपी संदीप उर्फ कटप्पा हिरामण गुरपुडे (वय २८ वर्ष) रा. खेड(मक्ता) याच्या वर महाराष्ट्र  गुन्ह्याची दाखल करण्यात आला आहे.