• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ब्रम्हपूरी तालुक्यातील बोडेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

    गुरे चराईसाठी जनावरांना जंगलात घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. मोना आत्माराम धानोरकर वय ५५ असे जखमी गुराख्याचे नाव आहे. जखमी गुराख्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
    मुडझा येथील मोना धानोरकर हा गुराखी नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी ब्रम्हपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मुडझा येथील जंगल परिसरात गेला होता.  बोडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २१६ परिसरातील झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने मोना धानोरकरवर हल्ला केला. यात गुराखी गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक नागोसे, मुडझा येथील वनरक्षक दाते आणि मने यांनी आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह जखमी गुराख्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यापूर्वी १७ आँगस्ट रोजी डोर्ली येथील गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती.