• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  भाजप नगरसेवक आज घेणार विभागीय आयुक्तांची भेट
  मनपातीलगटनेताबदलविण्यासाठीच्या हालचालींना वेग
  जयश्री जुमडे यांच्याकडे गटनेते पद जाण्याची शक्यता

  महापालिकेतील भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांना बदलविण्याचा निर्णय जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार
  आज भाजप आणि मित्र पक्षाचे नगरसेवक विभागीय आयुक्तांची भेट घेणार असून, नगरसेविका जयश्री जुमडे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
  स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीवरून भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगलीच अंतर्गत धुसफूस आहे. गटनेते वसंत देशमुख यांनी आपल्याला सभापती पद देण्यात येणार असल्याचे सांगून सभागृह नेता या पदाचा राजीनामा घेतला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आपले आश्वासन पाळले नाही. ऐनवेळी रवी आसवानी यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घालण्यात आली. अवघ्या काही महिन्यांचा कार्यकाळ आसवानी यांना मिळणार होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आली आणि आसवानी यांना मुदतवाढ मिळाली. आता कोरोना ओसरल्यानंतर नगरविकास मंत्रालयाने स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे निम्मे सदस्य बाहेर पडले. त्यात स्वतः विद्यमान सभापती रवी आसवानी यांचासुद्धा समावेश आहे. आता नवीन नावे पाठविण्याचा अधिकार गटनेते म्हणून वसंत देशमुख यांना आहे. पक्षाच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी दिलेली नावे समितीत पाठविणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर दगाफटका नको म्हणून स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. आता आज
  विभागीय आयुक्तांकडे ओळख परेड करण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे आपले पद वाचविण्यासाठी देशमुख यांनीसुद्धा धावपळ सुरू केली असल्याचे समजते.