• Advertisement
 • Contact
More

  मगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी सालली तालुक्यातील हरांबा येथील घटना, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

  नाल्यात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मगराने हल्ला करून जखमी केले. ही घटना सावली तालुक्यातील हरांबा येथे शुक्रवारी (ता. २०) दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. महादेव तुकाराम भोयर (वय ४०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
  हरांबा येथील महादेव तुकाराम भोयर हे आज सकाळच्या सुमारास शेतशिवारात जनावरे चराईसाठी गेले होते. दुपारपर्यंत चराई केल्यानंतर जवळच्या नाल्यात जनावरे धुण्यासाठी गेले होते. जनावरे धूत असताना अचानक मगराने महादेव भोयर यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर जनावरे पाण्याबाहेर पडाली. त्यानंतर
  महादेव भोयर यांनीसुद्धा मगराच्या तावडीतून सुटका करीत पाण्याबाहेर आले. या हल्ल्यात मानेला गंभीर जखमा झाल्या आहेत.
  घटनेची माहिती गावात मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमीला तातडीने
  लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैनगंगा नदीला पूर आल्याने नदीचा प्रवाह वाढला आहे. नदीचे पाणी कढोली येथील नाल्यापर्यंत आले आहे. या पाण्यासोबत मगर आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.