• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    मनपाचे आरक्षण तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच, नवे आदेश न आल्याने जुनाच निर्णयाची अमलबजावनी , उद्या होणार आरक्षण जाहिर

    राज्यशासनाने सन २०१७ च्या प्रभाग रचना निवडणुकीत कायम राहील, असा निर्णय घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या उद्या होणाऱी आरक्षण सोडत अंधातरी लटकली होती. मात्र राज्य निवडणुक आयोगांकडून यांसदर्भात कोणतेही लेखी आदेश आज गुरुवार रात्री उशिरापर्यंत आले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण केली आहे. उद्या २६ प्रभागातील ७७ जागांचे आरक्षण सोडत होणार आहे. पंरतु बदललेली प्रभाग रचना बघता या आरक्षण सोडतीला नेमका अर्थ किती, याबाबत संभ्रम आहे. या गोंधळाच्या स्थितीत इच्छुकांचा जीव मात्र चांगलाच टांगणीला लागला आहे.
    आठ जून २०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेला मंजुरी मिळाली. त्यानंतर आक्षेप आणि हरकती मागविण्यात आल्या. त्याचे निराकरण झाल्यानंतर ६ जुलै २०२२ रोजी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा मंजुर झाला. या आराखड्यानुसार २६ प्रभागात ७७ सदस्यांना निवडून मनपात पाठवायचे आहे. ही तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. ज्या प्रभागाची लोकसंख्या सरासरी १२ हजार कमाल ते ११ हजार किमान एवढी असेल तिथे तीन सदस्य आणि आठ ते सात हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागातून दोन सदस्य निवडणून द्यायचे आहे. यानुसार पाच आॅगस्टला आरक्षण सोडतीची तारीख ठऱली. त्यामुळे मनपाचा कार्यकाळ उलटून तीन महिने झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रतिक्षेतील इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. एकदा आरक्षण निश्चित झाले की कोणत्या प्रभागातून लढायचे, याचे आराखडे त्यांच्याकडून मांडले जाणार होते. मात्र आरक्षण सोडतीला दोन दिवसांचा अवधी असताना नव्या सरकारने सन २०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नव्या रचनेत चार सदस्यांचा प्रभाग राहणार आहे. त्यामुळे १७ प्रभागातून ६६ सदस्यांनाच मनपात जाण्याची संधी मिळणार आहे. नव्या अकरा जागा प्रभाग रचनेत वाढनार होत्या मात्र त्या पन कमी होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे आरक्षण सोडत होणार नाही, असा मनपा प्रशासनाचा समज झाला. परंतु यासंदर्भात निवडणुक आयोगाकडून आज गुरुवारला दिवसभरात कोणत्याही सूचना आल्या नाही. त्यामुळे उद्याची आरक्षण सोडत कायम राहील. मात्र सन २०१७ च्या प्रभाग रचनेची अधिसूचना निघाल्यास या आरक्षण सोडतीचे काय याचे उत्तर सध्यातरी कुणाकडे नाही. हे सर्व शासकीय सोपस्कार आहे. त्यामुळे तो पूर्ण करण्याशिवाय तुर्तास पर्याय नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.