
नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार उपायुक्त विशाल वाघ यांनी काळ सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर कंचर्लावार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवित काळ्या फिती लावून काम केले.