
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर विपिन पालीवाल यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
आयुक्त, महानगरपालिका चंद्रपूर या पदावर कार्यरत असलेले राजेश मोहिते यांना 3 जानेवारी 2022 रोजी आयुक्त या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले. मोहिते हे सध्या वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने त्यांना मंत्रालय येथे रुजू झाल्यानंतर नवीन पदस्थापना देण्यात येणार आहे.
विपीन पालीवाल हे 23 जून 2021 पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.