• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    मनपा गटनेत्यांने आत्मदहनाचा इशारा घेतला मागे 
    प्रभागात अमृतची कामे सुरु झाल्यामुळे घेतला निर्णय 

    चंद्रपूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक १७ मध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत. तसेच अमृत जल योजनेच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या आमसभेत आत्मदहन करणार असल्याचा इशारा बहुजन समाज पक्षाचे गटनेते अनिल रामटेके यांनी दिला होता. यानंतर मनपाने हा विषय गंभीरतेने घेत प्रभागात अमृतची कामे सुरु केली. तर, काही कामे प्रस्तावित केली. त्यामुळे आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे रामटेके यांनी कळविले आहे. रामटेके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक १७ चे प्रतिनिधित्व करतात. या प्रभागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी समाजाचे सर्वाधिक प्राबल्य आहे. मात्र, महापालिकेकडून या प्रभागात विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे आमसभेत अमृताच्या कंत्राटदाराला बोलावून माहिती द्यावी, अन्यथा आमसभेत आत्मदहन करणार असल्याचा इशारा बहुजन समाज पक्षाचे गटनेते अनिल रामटेके यांनी दिला होता. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, मनपाने याची गंभीर दखल घेत कामे सुरु केली. तसेच काही कामे प्रस्तावित केली. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे रामटेके यांनी स्पष्ट केले.