• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा नविन कार्यकारणी वरुन वादंग , महासचिवांना मिळनार डच्चु

    महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या नव्या १९० सदस्यांच्या जम्बो कार्यकारिणीवरून पक्षांतर्गत वादळ उठले आहे. या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश झाला आहे. माजी आमदार अविनाश वारजुकर यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र पक्षांतर्गत विरोधकांनी याचां तक्रारी पक्षनेतृत्वाकडे केल्या आहेत. त्यामुळे या नावांवर फेरविचार केला जाईल, असा दावा सूत्रांनी केला. कार्यकारिणीत नवे चेहरे सामावून घेतले जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे त्यामुळे
    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीत राज्यभरातील १९० जणांचा स्थान दिले आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे वगळण्यात आली. पटोले यांना विश्वासात न घेता दिल्लीतून कार्यकारिणीत परस्पर काही नावे घुसविण्यात आली. कार्यकारिणीत स्थान देण्यासाठी पैसे घेतल्याचासुद्धा आरोप झाला. पटोले आणि राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या. पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले. त्यांनी कार्यकारिणीतील काही नावांवरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या कार्यकारिणीला दिल्लीतून अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही, अशीही माहिती आहे. नव्या जम्बो कार्यकारिणीतील काही नावे वगळण्यात येणार आहे, अशी चर्चा आता कॉंग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे.