• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली, मृतकाच्या भावाचा आरोप, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

    माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असल्याचे आरोप मृतकाच्या मोठ्या भावाने केला असून दोषी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी सचिन माने यांनी केली आहे. तर दुसरीकडे मृतकाच्या पत्नीला मारहाण झाली व तिच्यावर सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिचा सुद्धा मृत्यू झाला. त्यांनतर आता माझा बहिणीच्या मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी मृतक महिलेचा भाऊ किशोर कोलिया यांनी घुग्गुस पोलिसांकडे केली आहे. तशी तक्रार दोघांनीही पोलिसात दिली आहे.
    घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली .सुरज माने असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. मात्र मृतकाचे दोन्ही पाय जमिनीला टेकून असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.दरम्यान काल मृत ट्रॅक्टर चालकाच्या पत्नीला सुध्दा जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा सुध्दा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांनतर मृतकांच्या नातलगांनी घुग्गुस पोलिसात दोघांची हत्या झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींना अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.