• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  मानव-वन्यजीव संघर्षाने घेतले सात महिण्यात २५ जणांचे बळी

  चंद्रपूरची ओळख वाघांचा जिल्हाअशी आहे  मात्रइथे वाघ व इतर हिस्र प्राण्यांचे हल्लेही थांबता थांबत नाही.यावर्षी
  अवघ्या सात महिन्यांत वाघ व इतर जंगली श्वापदांचा हल्यात तब्बल 25 जणांना बळी गेला आहे. या घटनांनी त्या त्या  भागातील वाघ बिबट अस्वल या जंगली हिस्र प्राण्यांचा
  बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे.हे हल्ले असेच सुरू
  राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात कुठे ना कुठे वाघांचे व इतर प्राण्यांचे दर्शन होते.जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे.. काही गावांतील
  नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे.तेंदुपत्ता हंगाप आला तर जंगलात
  जावे लागते . अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही
  गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही.अशावेळी  जंगलातील हिस्र प्राण्याचा हल्यामुळे  गेल्या सात महिन्यांत तब्बल 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.यावर आता कायमचा तोडगा काढण्यासाठी वनविभागाचा वतीने  गावागावात  मानव-वन्यजीव संघर्ष संधर्भात जनजागृती केली जात असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ- जितेंद्र रामगावकर यांनी सर्च टिव्हशी बोलताना दिली .