• Advertisement
 • Contact
More

  मोटारसायकल चोर मूल पोलिसांच्या जाळ्यात
  २४ तासात चोरट्यास केली अटक

  मूल घरी ठेवलेली मोटारसायकल : अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्यादी मेघशाम दादाजी लैनगूरे (३८) रा. डोंगरगाव यांनी मंगळवारी मूल पोलीस ठाण्याला दिली. पोलिसानी तपास करून अवघ्या २४ तासात आरोपी दिलीप गनपत मानकर रा. डोंगरगाव ता. सिंदेवाही याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
  मूल तालुक्यातील डोंगरगाव येथील मेघशाम दादाजी लैनगूरे यांनी स्वतःच्या मालकीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक ३४६६७५ घरी ठेवली होती. मंगळवारी रात्रीला अज्ञात इसमाने मोटारसायकल चोरी केल्याची तक्रार मुल पोलिसात दिली मुलच्या
  गुन्हे शोध पथकाने मौजा चिचाळा येथील देविदास श्रावण बोबाटे यांच्या जुण्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता बोबाटे यांनी हा मोटारसायकल दिलीप गणपत मानकर रा. डोंगरगाव ता. सिंदेवाही याने आणून दिल्याचे सांगितले.
  पोलिसांनी सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे जाऊन आरोपी दिलीप मानकर याला ताब्यात घेतले. आरोपीवर भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनूज तारे यांच्या मार्गदर्शनात मूलचे ठाणेदार सतिशसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे