• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  युवकाला देशी कट्टा, चार जिवंत काडतुसासह अटक
  स्थानिक गुन्हे शाखेची टॉवर टेकडी परिसरात कारवाई 

  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना भिवापूर वार्डातील सागर संतोष येलपावार वय २१ हा युवक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागील टॉवर टेकडी परिसरात देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले. सागर येलपावार हा युवक संशयास्पदस्थितीत फिरताना आढळून आला. त्याची तपासणी केली असता देशी कट्टा, चार जिवंत काडतूस आढळून आले. 
  त्याची किंमत सुमारे ३२ हजार रुपये आहे. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चंद्रपूर शहरात भरदिवस झालेल्या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे देशी, विदेशी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी देशी, विदेशी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या होत्या. 
  ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक बोबडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, संदीप कापडे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, सतीश बगमारे, प्रमोद कोटनाके, संजय वाढई, मिलिंद यांच्या पथकाने केली.