
बहीण-भावाचे अतूट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे
राखी पौर्णिमा. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाने हिरमुसलेल्या व्यापाऱ्यांनी नव्या
जोमाने राखी सणानिमित्ताने डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठ राख्यांनी फुलली आहे. यंदा नव-नव्या ट्रेंडमध्ये बाजारपेठेत राख्या उपलब्ध आहे.