• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    राज्यातील आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांने संपविले जिवन ; चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी आगारातील घटना

    राज्य सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांचे राज्यभरात आंदोलन सूरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात या आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.राज्य सरकारने st कर्मचाऱ्यांचा आंदोलनावर अद्यापही ठोस भुमिका घेतली नाही.त्यामुळे संप अधिक तिव्र झाला आहे.राज्यातील काही st कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली.यावर राज्य सरकारवर सर्वत्र टिका होत असतांनाच पुन्हा एका कर्मचार्याने आपले जिवन संपविले.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी आगारातील सत्यजित ठाकूर या कर्मचाऱ्यांने ब्रम्हपूरी शहरातील राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली.गेले तीन दिवस कुणाचाही संपर्कात ठाकूर नव्हते,अशी माहीती आहे.आज शेजार्यांनी दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे दार तोडल्या गेले.तेव्हा ठाकूर हे रूम मध्ये निपचीत पडले होते.घटनेची माहीती ब्रम्हपूरी पोलीसांना देण्यात आली.पुढील तपास पोलीस करीत आहेत.ठाकूर यांच्या आत्महत्येमुळे चंद्रपूरातील आंदोलन तिव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.