• Advertisement
 • Contact
More

  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा असाही संवाद
  आंगनवाडी सेविकांचा रस्त्यातच जानुन घेतल्या अडचणी

  राज्याचे नगरविकास, आदिवासी कल्याण, ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जीवतीहून पाटण कडे जातांना मध्ये त्यांना शेकडो अंगणवाडी सेविका पायी जातांना दिसल्या. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भान राखत आपला ताफा थांबवून या अंगणवाडी सेविकांशी वाटेतच संवाद साधत, त्यांच्या कार्याची आस्थेने विचारपूस केली, त्यांच्या काही अडचणी आहेत का असा प्रश्न विचारल्यावर सर्वांनी कुठल्याही अडचणी नसल्याचे सांगितले व याच सरकारने आमच्या मानधनात वाढ केल्याबद्दल त्या सर्व अंगणवाडी सेविकांनी मा. मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी पक्षाचे नेते किती संवेदनशील आहेत हे या एका प्रसंगावरून दिसून येते. या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील आमदार व चंद्रपूरचे पक्ष निरीक्षक मनोहर
  चंद्रिकापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा  बेबीताई उईके,नितीन भटारकर,
  आदी दौऱ्यात उपस्थित होते.