• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे (इंटक) कामगार संमेलन

  राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या वतीने (इंटक) शक्तीनगरातील सदभावना भवन येथे एकीकरण- कामगार संमेलन आयोजित करण्यात आले होते.
  या कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, संघाचे अध्यक्ष माजी आमदार एस. क्यू. जमा, संघाचे महामंत्री के. के. सिंग, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नागपूर क्षेत्राचे अध्यक्ष नरेश बरबे, शंकर दास, चंद्रमा यादव, रामपाल वर्मा, धनंजय गुंडावार, फेडरेशनचे उपाध्यक्ष एस. एस. जमा, नदीम जमा, शंकर खत्री उपस्थित होते.
  यावेळी खासदार धानोरकर यांनी, इंटकला मजबूत केल्याशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे इंटकच्या सर्व उपक्रमांवर खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे लक्ष आहे. आपल्या विजयात कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या काळात इंटक कामगारांचे संमेलन घेणार असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
  एस. क्यू. जमा यांनी, केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी, राष्ट्रविरोधी, देशविरोधी धोरणांचा विरोध केला. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात इंटक नेहमीच उभी राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नरेश बरबे, शंकर खत्री, नदीम जमा यांनीही मार्गदर्शन केले. के. के. सिंग यांनी, खासदार बाळू धानोरकर, एस. क्यू. जमा, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी इंटकच्या पाठीशी नेहमीच राहत सहकार्य करीत असल्याबद्दल आभार मानले.
  यावेळी इंटमध्ये प्रवेश करणाऱ्या कामगारांचा खासदार बाळू धानोरकर, एस. क्यू. जमा यांनी दुपट्टा टाकून पुष्प देऊन स्वागत केले. संचालन अविनाश लांजेवार यांनी केले.