• Advertisement
  • Contact
More

    रेतीची चोरी तरना-या तिन ट्रक्टरवर तहसीलदारांची कारवाई
    सिनेस्टाईल पाटलाग करुन घेतले ताब्यात

    रेतीची चोरी करण्याचा उद्देशाने निघालेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाही शनिवारी मध्यरात्री कुलथा परिसरात करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी गोंडपिपरी तहसीलदारांनी कार्यवाहीचा सपाटा सुरू केला. त्यानंतर रेती तस्कर धास्तावले होते. आता परत तस्करांनी डोकेवर काढले आहे.
    तीन ट्रॅक्टर रेतीचोरीसाठी निघाल्याची माहिती गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांना मिळाली. त्यानंतर सहकाऱ्यांना घेऊन तहसीलदारांनी घाटावर जात ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने रेतीची अवैध वाहतूक नोठ्या प्रमानात होत आहे.