• Advertisement
 • Contact
More

  रेल्वे लाईनमुळे रामपूर येथे कृत्रिम पूरस्थिती
  राजुरा-गोवरी-माथरा मार्गावरील वाहतूक बंद;

  राजुरा : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून याचा परिणाम दिवसेंदिवस मानवी जीवनावर पाहायला मिळत आहे. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वन विभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा माल वाहतुकीसाठी रेल्वे लाईन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाईन च्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे याचा प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  माणिकगढ (चुनाळा) येथून अंबुजा, एल अँड टी, माणिकगढ, वेकोली परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाईन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाईन व रामपूर वस्तीलगत वन विभागाची मोठ्याप्रमाणात जमीन आहे पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमानात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाणे येत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नेहमी राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून संपूर्ण परिसर जलमय होतो. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. हि समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेला सुद्धा होत आहे.

  रेल्वे लाईन परिसरात रेल्वे कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात माती काढल्यामुळे मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, रेल्वे लाईनच्या दुसऱ्या बाजूने कापनगाव आहे, त्या परिसरातील पाणी रेल्वे लाईन खालील पूलाने रामपूर वस्तीतच येत असते यामुळे थोड्या पावसालाही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने हि कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे पाहायला मिळत आहे, मात्र कायमचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

  *कोट : रामपूर वस्तीतील बऱ्याचशा भागात जंगलातील व रेल्वे लाईन ने पावसाचे पाणी येत असते यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली, परंतु रेल्वे विभागाच्या क्षेत्रात बहुतांश भाग येत असल्याने रेल्वे विभागाने लक्ष देऊन वस्तीत येणारे पाणी भवानी नाल्याकडे वढते करावे, बांधकाम विभाग करीत असलेल्या नाल्यांचे पाणी सास्ती रोड कडून नाल्याकडे वळते करावे : प्रमोद पानघाटे, सामाजिक कार्यकर्ता रामपूर*

  *मानवाने नदीला नाले, नाल्याला नाली बनविली असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडत असतो यामुळे बऱ्याच भागात कृत्रिम पुरसदृश स्तिथी दिसून येत आहे. अनेक ले-आऊट धारकांनी नाल्याच्या प्रवाहाचे मार्ग बदलविले असल्यामुळे कृत्रिम पूरस्थिती दिसत आहे. : आनाजी आगलावे, सामाजिक कार्यकर्ता*