• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    रोहयो समितीकडून २१ ग्रामपंचायतींच्या कामांची पाहण

    महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाली. समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात समितीच्या सदस्यांनी पाच तालुक्यातील २१ ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे, आमदार चंद्रिकापुरे यांनी माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम जिवती व कोरपना या दोन तालुक्यांना भेटी देऊन पाहणी केली. समितीमधील २५ आमदार सदस्यांपैकी १५ आमदार सदस्य आले. २१ ग्रामपंचायतीच्या कामांची पाहणी करण्याकरिता चार पथक केल्या गेल्या. या पथकाच्या माध्यमातून बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती, वरोरा तालुक्यात पाठवण्यात आल्या. समितीचे अध्यक्ष आमदार चंद्रिकापुरे व आमदार अमोल मिटकरी यांनी कोरपना व जिवती तालुक्यातील कामांची पाहणी केली.