• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वडिलाने केला मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न पीडित मुलीची रामनगर पोलीसात तक्रार

    घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर कुटुंबातील सर्वांची माफी मागितली. काही महिने चांगले गेले. मात्र, पुन्हा तोच प्रकार सुरु झाल्याने कंटाळलेल्या मुलीने वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. येथील बंगाली कॅम्प परिसरात एक कुटुंब राहते. त्यांना मुलगा, मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दहावीनंतर मुलगी आईसोबत घरकाम करण्यासाठी जात आहे. लहान भाऊसुद्धा दुसरीकडे काम करीत आहे. मात्र, वडील कोणतेच काम करीत नाही. त्याची वयात आलेल्या मुलीवर वाईट नजर होती. मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लाकडाउन काळात एक दिवस घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने धक्का देत घराबाहेर पळ काढला. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर वडिलाला घराबाहेर काढून देण्यात आले. तब्बल तीन महिन्यांनी आईला फोन करून अपघात झाल्याने घरी नेण्याची विनंती केली. यावेळी यापुढे तसा प्रकार होणार नसल्याचे सांगून माफी मागितली. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा वडिलांकडून त्रास देणे सुरु झाले आहे. रात्रीच्या सुमारास शरीराला हात लावणे असे प्रकार वाढले. याची कुठे वाच्य्यता केल्यात जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.