• Advertisement
 • Contact
More

  वरोरा तालुक्यातील नायगाव येथील शाळकरी मुलांनी तहसील कार्यालयावर नेला बैलबंडी मोर्चा

  वरोरा तालुक्यातील नायगाव बऱ्याच दिवसापासून चर्चेचा विषय ठरला आहे. या गावाला वर्धा पावर आणि जी .एम.आर कंपनी लागून आहेत. जेव्हा या कंपन्या आल्या तेव्हा या गावाला दत्तक सुद्धा घेण्यात आले होते मात्र विकासाच्या नावावर अजून पर्यंत भोपळाच मिळाला आहे.
  प्रशासकीय अधिकारी व राजकारणातील या ठिकाणी येऊन पाहणी करून जातात. मात्र आश्वासनाशिवाय नायगावा येथिल जनतेला काहीच मिळत नाही.
  त्यांच्या अडचणीत पुन्हा भर टाकत नायगाव ते वरोरा या कच्चा रोडवर ४० ते ५० टन कोळसा भरलेले ट्रकची जड वाहतूक केली जाते. त्यामुळे कसातरी सुरु असलेला रोड शाळकरी मुलांसाठी बंद झाला. त्यामुळे बस सुद्धा बंद झाली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य सुद्धा शेतीवर नेता येत नाहीत रोडवरून जाताना कपडे खराब होतात.  अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. सोयाबीन पिकाची काढणी नुकतीच सुरू होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते  पीक तिथेच सडणार अशी शंका व्यक्त केली जात आहे.
  या सगळ्या बाबी चे निवेदन देण्यासाठी शाळकरी विद्यार्थी व तेथील शेतक-यांनी बैलबंडी मोर्चा काढत थेट तहसील दारांच्या दारात बैल बंड्या उभ्या केल्या त्यामुळे पोलिसांना बोलवून स्थिती सांभाळावी लागली.