• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वरोरा शहरात भरदिवसा घरफोडी सहा तोळे सोने व दीड लाख लंपास

    मागील काही दिवसांपासून वरोरा शहर व परिसरात चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला आहे. वरोरा शहरातील शिवाजी वॉर्डात घरी कोणीही नसल्याची संधी साधून भरदिवसा घरफोडी करून घरातील सहा तोळे सोने व दीड लाख रुपये रोख घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याने पोलिसांसमोर आव्हान कायम ठेवले असल्याचे दिसून येते.
    वरोरा शहरातील शिवाजी वॉर्डातील राम मंदिराजवळ मारुती शंकर कुत्तरमारे हे दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून मुलावर उपचार करण्याकरिता रुग्णालयात गेले होते. दोन तासांनी घरी परत आल्यानंतर समोरील दाराचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटामध्ये
    ठेवलेले सहा तोळे सोने व दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले; परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही.