• Advertisement
 • Contact
More

  वाघाचा हल्यात गुराखी ठार…..

  मूल तालुक्यातील मारोडा गावातील एका इसम वर वाघाने हल्ला करून गुराख्यास ठार केल्याची घटना घडली. सदर घटनेतील मृतकाचे नाव गजानन गुरनूले वय 60 वर्षे रहिवासी मारोडा असे आहे.
  मृतक गजानन नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चरावयास गेला होता. संध्याकाळच्या वेळीस गावातील सर्व बैल घरी परत आले पण बैल राखणारा गजानन परत न आल्याने परिवारातील सदस्याने शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळा नंतर जिथे तो बैल चारावायला गेला त्या शेतात रात्री 8.30 च्या दरम्यान त्याची टोपी व थोड्या अंतरावर त्याचे कपडे सापळले. त्याच दिशेनं शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगर देवीच्या जवळ गजानन चा
  मृतदेह सापळला.
  सदर घटनेची माहिती वनविभागाला व पोलीसाना देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून

  पंचनामा करण्यात आला.

  विशेष म्हणजे मृतकावर या पूर्वी सुध्या 2021 च्या उन्हाळ्याच्या काळात वाघाचा हल्ला झाला होता, मात्र त्या हल्यात तो जखमी झाला आणि त्याचे प्राण वाचले होते. मात्र दुसऱ्यांदा त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मारोडा गावात पुन्हा एकदा भीतीच वातावरण पसरले आहे