• Advertisement
  • Contact
More

    वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
    मांगली जंगलशिवारातील घटना, दोन दिवस होता बेपत्ता

    तालुक्यातील मांगली गावाशेजारच्या जंगलात  गुरे चारण्यासाठी गेलेल्या  एका गुराख्यास वाघाने ठार केल्याची घटना आज गुरुवारी उजेडात आली. मृताचे नाव मधुकर पैकाजी कोटनाके (वय ५५ रा. मांगली) असे आहे.
    गेल्या दोन आगस्ट रोजी मधुकर कोटनाके हा गावाशेजारी असलेल्या निर्गुडी जंगल परिसरात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेला होता. मात्र, संध्याकाळी गुरे परत आली. पण तो परतला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला. शेवटी आज गुरुवारी  दुपारच्या सुमारात त्याचे छिन्नविचित्र झालेले प्रेत गावकऱ्यांना जंगलात आढळले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. लगेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृत्तदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. गावातील गुरेढोरे चारून तो आपल्या कुटुंबाचा गाडा  चालावायचा. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर संकट कोसळले आहे.