• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
  ब्रम्हपूरी तालुक्यातील घटना

  ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या बल्लारपुर या गावातील शेतकरी शेतशिवारात असलेल्या आपल्या शेतावर गेला असता त्याच्या वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी ३१ जूलै रोजी रात्री १० वाजता च्या सुमारास उघडकीस आली यामध्ये मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव हिरामण झिटु कोटगले (वय ६८ वर्ष) रा. बल्लारपूर ब्रम्हपुरी तातुका ब्रम्हपूरी असे आहे तालुक्याच्या हे गाव जिल्याचा शेवटच्या टोकावर असुन जंगलव्याप्त भागात वसले आहे. या गावातील शेतकरी हे पद्मापुर शेतशिवारात असलेल्या आपल्या शेतावर शेतकामासाठी गेले होते. सायंकाळ होवुनही ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी सदरची माहिती वनविभागाला दिला.व  गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने गावासभोवताल च्या परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर रात्री 9-30 वाजता च्या सुमारास पद्मापुर शेतशिवारातील झुडपात हिरामण कोटगले यांचा मृत शरीर आढळून आला. प्राथमिक अंदाजावरून सदर शेतकऱ्याचा मृत्यू हा वाघाने हल्ला केल्यामुळे झाला असल्याचा अंदाज आहे
  घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेंढे, उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राम्हणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे हे घटनास्थळी दाखल झाले.
  त्यानंतर घटनेचा पंचनामा केला.
  व वनविभागाने वतीने मृतकाच्या वारसांना तात्काळ 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.