
भद्रावती वनपरीक्षेत्रात वाघ आणी बिबट्याच्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना घडली आहे यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केलीजात आहे.
प्राप्त माहितीनुसार,आयुध निर्माणीच्या वसाहतीत काल बिबट मृतावस्थेत आढळून आला. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर बिबट हा नर असून ७ ते ८ वर्षे वयाचा आहे. पट्टेदार वाघासोबत झालेल्या झुंजीत तो ठार झाल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास भद्रावती वन परिक्षेत्र अधिकारी करीत आहे.