• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  वाद असलेल्या बँकेच्या अध्यक्षांना घेतले संस्थेत
  विनोद दत्तात्रय यांचा आरोप, ना देय कर्जाला विरोध केल्याने केले पदावरून कमी

  सरदार पटेल मेमोरियल सोसायटी आणि कन्यका नागरी सहकारी बँक यांच्यात कर्जावरून वाद सुरु होता. मात्र, संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांनी सहधर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानंतरही वाद सुरु असलेल्या बँकेच्या अध्यक्षांना संस्थेत घेतले. ना देय असलेल्या कर्जाच्या प्रकरणाला आपण विरोध केल्यामुळे आपल्याला संस्थेच्या पदावरून कमी केल्याचा आरोप विनोद दत्तात्रय यांनी केला आहे.
  डीआरटी कोर्टाने दिलेल्या निकालात कन्यका नागरी सहकारी बँकेने तत्कालीन प्राचार्यांना दिलेल्या कर्जाशी काहीही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर बँकेनेसुद्धा कर्जाचे प्रकरण विड्रॉल केले. मात्र, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शफिक अहमद यांनी २ कोटी ८५ लाखांचे कर्ज बँकेला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संस्थेवर मोठा आर्थिक बोझा पडणार होता. त्यामुळे या प्रकाराला आपण विरोध केला. तेव्हा आपल्यालाच पदावरून कमी केले. एवढेच नाही तर वाद सुरु असलेल्या बँकेच्या अध्यक्षांना संस्थेत घेतले. त्यामुळे या संस्थेच्या हितासाठी कोण आणि विरोधात कोण हे दिसून येत असल्याचेही विनोद दत्तात्रय यांनी म्हटले आहे.या
  संदर्भात संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शफिक अहमद व विजय आईचंवार यांचाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here