
चिमूर विधानसभा क्षेत्रातील धनराज मुंगले यांनी गुरुवारी रात्री काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
२०१९ मध्ये भाजप सोडून धनराज मुंगले यांनी चिमूर विधानसभेची स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाच्या व ओबीसी महासंघाच्या
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नाम, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंगले.
माध्यमातून ते ओबीसी समाजाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेत असतात, धनराज मुंगले काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा जुलै महिन्याच्या प्रारंभी पासुनच होती. ती शेवटी खरी ठरली. धनराज मूंगले
यांच्यासोबत नेरीचे माजी सर यशवंत वाघे, खडसंगीचे विठ्ठल पाटील कोरेकर, भिसी शिवसेना शहरप्रमुख नाना नंदनवार, शंकरपूर येथील अनंता येळणे, चिमूरचे प्रदीप तळवेकर यावेळी उपस्थित होते.