• Advertisement
  • Contact
More

    विज पडून दोघांचा मृत्यू ; गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथिल घटना

    शेतात डवरन करीत असतांना विज कोसळल्याने दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे दुपारचा सूमारास घडली.रेखा अरूण घुबडे,मारोती बाबुराव चौधरी अशी मृतकांची नावे आहेत.

    गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथिल रेखा अरूण घूबडे  यांनी सहा एकर शेती ठेक्याने घेतली. गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस पिक उभे आहे. शेतात डवरण करण्यासाठी रेखा घुबडे यांनी गावातील मारोती चौधरी याला बोलाविले.सोबतच दोन मजूर शेतात काम करीत होते.अंदाजे तीन वाजताचा पावसाचे वातावरण झाले.याच दरम्यान शेतात विज कोसळली. या घटनेत रेखा घुबडे,मारोती चौधरी यांच्या दुदैवी मृत्यू झाला.घटनेची माहीती मिळताच गावकर्यांनी धाव घेतली.प्रशासनाला घटनेची माहीती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सूरू आहे.