• Advertisement
 • Contact
More

  व्हॉट्सअँपवर स्टेट्स टाकून एका तरुण व्यापाऱ्याने आत्महत्या..
  चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील घटना

  व्हॉट्सअँपवर स्टेट्स टाकून एका तरुण व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 25 वर्षीय संदीप चौधरी असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. संदीपचं चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे मिठाईचं दुकान आहे.
  संदीपने काल व्हॉट्सअँपवर बाय बाय असं स्टेट्स लिहिलं होतं. ज्यामुळे मित्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र त्याच्या घरी मित्र पोहचेपर्यंत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुःखद म्हणजे 2 जुलैला संदीपचा वाढदिवस होता आणि त्याचे नुकतेच लग्न देखील ठरले होते. त्यामुळे चिमूर पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. संदीप चौधरी हा 25 वर्षीय तरुण उद्योजक होता. त्याचं चिमूर तालुक्यातील खडसंगी  येथे मिठाईचं दुकान आहे. या दुकानाचा सर्व व्यवहार संदीपच बघत होता. मात्र अचानक संदीपने काल व्हॉट्सअँपवर बाय बायचा स्टेटस ठेवला. संदीपचा नंबर ज्यांच्याकडे होता त्यांनी संदीपचा स्टेटस पाहिला. स्टेटस पाहून संदीपच्या मित्रांनी त्याला संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
  संदीपचे मित्र घरी पोहोचेपर्यंत त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. संदीपच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. संदीपने टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.