
चंद्रपूर : शहरातील ९९ जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीस बजावून इमारती पाडण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला होता. मात्र, इमारत मालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी आयुक्त राजेश मोहिते यांनी बुधवारी शहरातील जीर्ण इमारतींची पाहणी करून इमारत मालकांना इमारती पाडाव्या अन्यथा मनपा इमारती पाडेल आणि त्याचा खर्चसुद्धा वसूल करेल, अशी तंबी दिली आहे.
यावेळी उपायुक्त विशाल वाघ, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त शीतल वाकडे उपस्थित होते.
शहरात झोन क्रमांक १ मध्ये ४२, झोन क्रमांक २ मध्ये ३५ आणि झोन क्रमांक ३ मध्ये २२ अशा एकूण ९९ जीर्ण असल्याचा अहवाल मनपा प्रशासनाने तयार केला आहे.