
चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या वाॅर्डात दोघांनी गळफास लावून आज (ता. २०) आत्महत्या केली. वडगाव येथील मंगेश ठाकरे (वय ३५) याने घरीच गळफास लावून जीवनयात्रा संपविली. मंगेशने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. जलनगर येथील प्रान्शू तिवारी या सतरा वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी दोन्हा प्रकरणात मर्ग दाखल केला आहे.