• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायदळ वारी
  बससेवेचा अभाव; लाठी परिसरातील विद्यार्थ्यांची समस्या

  गोंडपीपरी तालुक्यातील लाठी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा नाही. त्यामुळे लाठी ते सोनापूर देशपांडे हे नऊ किलोमीटरचे अंतर विद्यार्थ्यांना पायदाळ गाठावे लागत आहे. नऊ किलोमीटरचा हा मार्ग घनदाट जंगलाने व्याप्त आहे.
  गोंडपिपरी तालुक्यातील लाठी येथे अकरावी, बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. त्यामुळे या परिसरातील पारडी, वामनपल्ली, सोनापूर देश, वेडगाव, पोडसा येथील मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी लाठी येथे येतात. त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळची बससेवा आहे. मात्र, महाविद्यालय सुटल्यावर परत गावकड़े येण्यासाठी बस सेवा नाही.
  त्यामुळे विद्यार्थ्यांना लाठी
  येथे शिक्षण घेण्यासाठी पायदळ वारी करावी लागते. लाठी ते सोनापूर देशपांडे या पोचमार्गाचे काम मागील तीन वर्षापासून अर्धवट आहे. त्याचा फटकासुध्दा परिसरातील जनतेला आहे. बसला
  लाठी येथे शिक्षण घेणाऱ्या
  विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेता लाठी ते सोनापूर देशपांडे ही सकाळी साडेअकराची परतीची बस सेवा सुरू करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण होणार नाही. त्यांची पायपीट थांबेल, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.