• Advertisement
  • Contact
More

    शिवभोजनच्या प्लास्टिक पॅकिंगमुळे कॅन्सरचा धोका
    गरीब लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळल

    गरीब तसेच गरजुंना ताजे आणि गरम भोजन मिळावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरु केली. मात्र, जिल्ह्यातील काही केंद्रातून अक्षरश: प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जेवण पार्सल दिले जात असल्यामुळे लाभार्थ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. प्लास्टिकमध्ये गरम अन्नपदार्थ टाकल्याने त्याचे विघटन होऊन ते अन्नपदार्थामध्ये व मिसळतात. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शासनाचा उद्देश चांगला असतानाही शिवभोजन संचालकांच्या पैसे वाचवण्याच्या शार्टकटमुळे गरीब लाभार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.
    जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र असून, ३ हजार ७०० वाळ्यांचे दररोज वितरण केले जाते. शिवभोजन केंद्रात बसून जेवण करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश केंद्रातून पार्सलच दिले जात आहे.