• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शुल्लक कारना वरुन शेतक-यावर हल्ला
    विळ्याने केला डोक्यावर वार

    कोरपना पोलिसठाणे हद्दीतील आवारपूर ग्रामपंचायतीचा शेतशिवारात एका शेतकऱ्याला शेजारच्या शेतकऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून विळ्याने डोक्यावर व हातावर वार करून जखमी केल्याची घटना काल सायंकाळचा सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन गडचांदूर पोलीसांनी तीन जणांविरुद्ध विवीध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अजीत नामदेव बोधाने वय वर्ष अंदाजे ४५ रा. आवाळपूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून अविनाश बबन चौधरी, आकाश नामदेव घोटकर, विट्ठल तुळशीराम चौधरी यांना पोलिसांनी अटक केली