• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शैक्षणिक शुल्क न भरलेल्या १३ विद्यार्थ्यांना दिल्या
    टीसी पालकांत तीव्र संताप, चंद्रपुरातील नारायणा विद्यालयम् व्यवस्थापनाचा प्रताप 

    चंद्रपूर : येथिल नारायणा विद्यालयम् ने शैक्षणिक शुल्क न भरलेल्या शाळेतील 13 विद्यार्थ्यांच्या घरी रजिस्टर्ड पोस्टाने टीसी पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. कोरोनामुळे बहुतांश वर्ग ऑनलाईन घेतले जात आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून पूर्ण शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून पालकांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. आता कोणत्याही पालकांचे मत विचारात न घेता अथवा पालकांना कुठलीही सुचना न देता नारायणा विद्यालयम् ने १३ विद्यार्थ्यांच्या घरी टीसी पाठवली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.