• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  संस्थापक अडबाले यांची दूरदृष्टी आणि संयमी नेतृत्वामुळे संस्थेची चौफेर प्रगती – माजी कुलगुरू किर्तीवर्धन दिक्षित

  नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूर व्दारा जिजाऊ सभागृह येथे आयोजित शिक्षक दिनानिमित्य सेवानिवृत्त तथा गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभाच्या विचार पिठावरून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे माजी कुलगुरू किर्तीवर्धन दिक्षित म्हणाले की, कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेचे नेतृत्वात असणारी दुरदृष्टी, संयमीवृत्ती, संस्थेवरील नियंत्रण आणि सर्वसामान्याचा संस्थेवर असणारा विश्वास यावर अवलंबून असतो. या पतसंस्थेचे नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक आमदार पदासाठी घोषित झालेले उमेदवार सुधाकरराव अडबाले यांचे कडे आहे. शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कामशैलीवर विश्वास आहे. आणि म्हणूनच अल्पावधित ही संस्था नागपूर विभागातील सहाही जिल्हयात पोहचली आहे. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिक्षकांनी श्री. अडबाले सरांच्या पाठीशी तन-मन.धनाने उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी आव्हान केले.
  सत्कार समारंभाचे प्रमुख पाहूणे प्राचार्य शामसुंदर धोपटे सर म्हणाले की, सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्तीनंतर मिळालेली जन्मभराची आर्थिक कमाई या पतसंस्थेत प्रचंड विश्र्वासाने गुंतवितो. आज ही पतसंस्था विदर्भातील पहील्या क्रमांकाची पतसंस्था म्हणून नाव रूपात आली आहे. या संस्थेचे नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह श्री. सुधाकरराव अडबाले करतात. त्यांना आम्हा शिक्षकांना शिक्षक आमदार म्हणून पहायचे आहे. आणि म्हणूनच आपण पूर्णताकदीने मी स्वतः शिक्षक आमदार पदासाठी लढतोय या भावनेनी काम केल्यास आपला विजय निश्चित होईल यात तिळमाम शंका का नाही.
  याप्रसंगी बोलतांना प्राचार्य अनिल शिंदे यांनी डॉ सर्वपल्ली  राधकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विजुक्टाचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक फोपळे यांनीही आपले विचार मांडले. विचारपीठावर प्राचार्य स्मिताताई ठाकरे, प्राचार्य आस्तिक उरकुडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,तथा विमाशी संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य श्री. काकडे, उपप्राचार्य श्री देवगडे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
  या सत्कार समारंभात आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक, प्राध्यापिका, सेवानिवृत्त शिक्षकांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ, स्मृत्ती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन सुरेंद्र अडबाले आणि मनिष कन्नमवार यांनी तर आभार प्रदर्शन  संजय ठावरी यांनी केले. सत्कार समारंभ  यशस्वी करण्यासाठी दिलीपराव मोरे, अशोक वरभे, अशोक बोढे, विनोद रणदीवे, सुनिल शेरकी, शरद डांगे, दिनकर अडबाले, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे,  प्रकाश अडबाले, प्रदीप वासेकर, प्रशांत अडबाले, अनिल नांदे, नकुल नामपल्लीवार, अमीत पोतराजे व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.