
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिंदेवाही-नागभीड मार्गावर करण्यात आली. सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे (वय २४, रा. राजुरा) आणि विकास अजय शर्मा (वय २२, रा. वडसा, जि. गडचिरोली अशी अटकेतील चोरट्यांनी नावे आहेत. घरफोडी, वाहनचोरी प्रकरणातील आरोपी पळ काढत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. तपासणीत त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. तसेच काही अंतरावर दोन दुचाकी लपवून ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सुमारे २ लाख ८० हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, राजेंद्र खनके, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, विनोद जाधव यांच्या पथकाने केली.