• Advertisement
  • Contact
More

    सर्वच धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकांनसाठी परवानगी घ्या
    जिल्हा पोलिसांचा सुचना

    धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरुन काही ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाले.यापार्श्वभूमीवर आता चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वच अधिकृत धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी देण्याची कारवाई सुरु केली आहे.
    धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहे. रात्री दहा ते सकाळी सहा यावेळात धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकांना बंदी घातली आहे. दरम्यान मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ३ मे पर्यंत सर्वच मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे, असा अल्टीमेटम त्यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र राज्य शासन सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसारच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात यावे, असा कुठेही उल्लेख नाही. केवळ त्यांची वेळ ठरवून दिली आहे. हा निर्णय सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना लागू होतो. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या धार्मिक स्थळांवर ध्ननिक्षेपक लावले आहे. परंतु त्याची परवानगी घेतली नाही. त्यांनी परवानगी घ्यावी, अशी भूमिका जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. त्याअनुषंगाने विना परवानगी ध्ननिक्षेपक लावण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांची माहिती घेतली जात आहे. त्यांना ध्ननिक्षेपकासाठी पोलिस विभाग परवानगी देत आहे, असे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.